MahaDbt शेतकरी योजना 2023 नवीन अर्ज सुरु | Mahadbt Farmer Scheme 2023

MahaDbt शेतकरी योजना 2023 नवीन अर्ज सुरु | Mahadbt Farmer Scheme 2023


शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यांच्या हितार्थ राबविण्यात येत आहेत. महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर शेतकरी योजना 2023 करिता नवीन अर्ज सुरु झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांना सर्व योजनांचा लाभ एकाच पोर्टलच्या माध्यमातून मिळवता यावा याकरिता MahaDbt शेतकरी पोर्टल हे सुरू करण्यात आलेले आहे. या पोर्टलच्या अंतर्गत विविध प्रकारचे योजना राबविण्यात येत आहेत. Mahadbt farmer Scheme Maharashtra नवीन अर्ज सुरू झालेले असून त्या संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.




शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर राष्ट्रीय कृषी विकास योजना तसेच कृषी यांत्रिकीकरण योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजना आणि फलोत्पादन विकास अभियान या घटकांच्या अंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. मित्रांनो महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर शेतकऱ्यांना एखाद्या mahadbt shetkari yojana अंतर्गत लाभ मिळण्याकरिता एकाच ठिकाणावरून अर्ज तर करता येतोच. त्याचबरोबर या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एक वेळेस अर्ज केल्यानंतर तो अर्ज शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत लाभ मिळे पर्यंत लागू असतो.

महाडीबीटी शेतकरी पोर्टल(maha Dbt Shetkari Portel Yojna) अंतर्गत शेतकऱ्यांनी एखाद्या योजने करिता सन 2022 मध्ये अर्ज केला तर त्या शेतकऱ्याची त्यावर्षी निवड न झाल्यास पुढच्या वर्षी करिता तो अर्ज पात्र ठरतो आणि शेतकऱ्याला पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळण्याकरिता महत्त्वपूर्ण असे हे महाडीबीटी शेतकरी पोर्टल आहे.

महाडीबीटी शेतकरी पोर्टल अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना MahaDBT Shetkari Yojana list :-
या योजने अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या काही योजनची नावे shetkari yojana list खालील प्रमाणे आहेत.

1. ट्रॅक्टर योजना
2. ट्रॅक्टर चलीत अवजारे
3. पॉवर टिलर
4. पंपसंच
5. मका सोलणी यंत्र
6. ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेअर
7. कॉटन श्रेडर
8. रीपर
9. ड्रॅगन फ्रुट
10. मशरूम उत्पादन प्रकल्प
11. मसाला पीक
12. जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन
13. सामूहिक शेततळे
14. शेततळे अस्तरीकरण
15. हरितगृह /शेडनेट हाऊस
16. मधुमक्षिका संच वाटप
17. पावर टिलर
18. प्लॅस्टिक मल्चिंग
19. मधुमक्षिका वसाहत
20. पॅक हाऊस
21. पॅक हाऊस
22. कांदा चाळ
23. प्राथमिक प्रक्रिया केंद्र
24. फिरते विक्री केंद्र
25. पाईप
26. पेरणी अर्ज
27. रीज फरो प्लांटर
28. रोटाव्हेटर
29. बहुपिक मळणी यंत्र

वरील सर्व योजना महाडीबीटी शेतकरी पोर्टल अंतर्गत राबविण्यात येत असून या योजने अंतर्गत अर्ज सुरु झालेले आहेत. वरील shetkari yojana yadi आहे.

महाडीबीटी शेतकरी पोर्टल अंतर्गत लाभ मिळण्याकरिता आवश्यक कागदपत्रे Documents for MahaDBT Shetkari Yojana:-

1. शेतकऱ्यांचे आधार कार्ड
2. शेतकऱ्यांचे बँक पासबुक
3. जातीचा दाखला
4. योजने संदर्भात बिल D
5. व इतर योजनेनुसार आवश्यक कागदपत्रे
6. पूर्व संमती पत्र

शेतकरी मित्रांनो MahaDBT Farmers Scheme अंतर्गत लाभ मिळण्याकरिता वरील सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळण्याकरिता तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या MahaDBT Shetkari Yojana अंतर्गत लाभ मिळण्याकरिता आधार कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तऐवज असून आधार कार्ड शिवाय या योजने अंतर्गत अर्ज करता येत नाही. शेतकऱ्याकडे आधार कार्ड नसेल तर त्यांनी सुरुवातीला आधार कार्ड काढून घ्यावे नंतर अर्ज करावा.

महाडीबीटी शेतकरी योजना करिता अर्ज कसा करायचा How to apply for MahaDBT Farmers Scheme:-

शेतकरी मित्रांनो महाडीबीटी शेतकरी पोर्टल अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला MahaDBT Farmers Portel वर नोंदणी करावी लागते. तुम्हाला तुमचे आधार कार्ड डिटेल्स व इतर माहिती टाकून वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करायची आहे.

https://mahadbtmahait.gov.in/ या लिंक वरून तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे. वरील लिंक या योजनेची अधिकृत वेबसाईट आहे.

नोंदणी केल्यानंतर युजरनेम आणि पासवर्ड च्या साह्याने किंवा आधार कार्डच्या माध्यमातून ओटीपी द्वारे महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर लॉगिन करायचे आहे. आता तुम्ही या MahaDBT Farmers Portel वर लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटच्या होम पेजवर अर्ज करा हा ऑप्शन दिसेल. अर्ज करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अनेक प्रकारच्या वर दर्शविलेल्या योजना दिसेल त्यापैकी ज्या योजने करिता तुम्हाला अर्ज करायचा आहे ती योजना निवडा त्या योजनेवर क्लिक करा.

योजने संदर्भात घटकाची तसेच संपूर्ण माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा. अर्जाची पेमेंट ऑनलाईन भरा. आता तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्याचा एसएमएस प्राप्त होईल.


महाडीबीटी शेतकरी पोर्टल अंतर्गत लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया Beneficiary Selection Process under MahaDBT Farmers Portal

शेतकरी मित्रांनो महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अधिकृत पोर्टलवरून अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज छाननीअंतर्गत मध्ये जातो. तुमच्या अर्जाची छाननी करण्यात येते या योजनेची निवड प्रक्रिया ही लॉटरी पद्धतीने करण्यात येते. या योजने अंतर्गत तुम्ही अर्ज केलेल्या योजनाची लॉटरी लागल्यानंतर जर तुमची ऑनलाईन लॉटरी मध्ये निवड झाली तर तुम्हाला एसएमएस प्राप्त होईल.

त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करणे तसेच योजनेचे काम सुरू करणे इत्यादी प्रक्रिया सुरू करायची आहे.

महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत लाभ मिळण्याकरिता आवश्यक बाबी:-

1. या योजने अंतर्गत लाभ मिळण्याकरिता तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असायला पाहिजे. 2. या योजने अंतर्गत अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांकडे आधार संलग्न

बँक खाते असायला पाहिजे.

3. योजने अंतर्गत लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.

4. योजने अंतर्गत लागण्याकरिता शेतकऱ्यांनी सुरुवातीला नोंदणी करावी नंतर लॉगिन करून ऑनलाईन अर्ज सादर करावा.

महाडीबीटी शेतकरी योजना 2023 संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अश्याच योजना विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Post a Comment

0 Comments